गंगाखेड (parbhani news) : जुन्या भांडणाच्या रागातून फायटरने मारहाण करून दोघांचे डोके फोडल्याची घटना दिनांक ३० एप्रिल मंगळवार रोजी गंगाखेड शहरात घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माहितीनुसार, (Gangakhed taluka) गंगाखेड तालुक्यातील दामपुरी येथील अक्षय लक्ष्मण रायभोळे व त्याचा चुलता रजनीकांत रायभोळे हे दोघे दिनांक ३० एप्रिल रोजी गंगाखेड शहरात मिस्त्रीचे काम करून रात्री ८ वाजेच्या सुमारास गावाकडे जाण्यासाठी बस स्थानकावर जात होता. भरड कॉम्पलेक्स जवळ समोरून आलेल्या विकास पंडीत, अविनाश व्हावळे दोघे रा. लिंबेवाडी ता. गंगाखेड व सुमेध गायकवाड रा. मालेवाडी यांनी आमच्या गावातील मुलांसोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ केली. तेंव्हा आम्ही त्या भांडणात नव्हतो, असे रजनीकांत रायभोळे यांनी सांगताच वरील तिघांनी फायटरने मारून आम्हा दोघांचे डोके फोडत जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद अक्षय रायभोळे यांनी दिल्यावरून (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार शंकर रेंगे पाटील करत आहे.