गंगाखेड (parbhani news ) : बदनामीच्या भितीपोटी शहरातील १९ वर्षीय युवतीने केलेल्या आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
पोलीस हक्क संघर्ष संघटनेची मागणी
पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या (Police Rights Organization) वतीने दिनांक ३० एप्रिल रोजी गंगाखेड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याची धमकी देत मयत तरुणीच्या आई-वडिलांना दोन लाख रुपयांची मागणी करत आरोपीने तरुणीसह आई-वडिलांना ब्लॅकमेलिंग केल्याने ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून बदनामीच्या भितीपोटी शहरातील १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन (parbhani news) आत्महत्या केल्याची घटना दिनांक २५ एप्रिल रोजी घडली होती.
अत्यंत निंदनीय घटना
या अत्यंत निंदनीय घटनेचा पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने जाहीर धिक्कार करत (parbhani news) सदर घटनेतील तीन आरोपींपैकी दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे मात्र व्हिडिओ करणारा मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. या आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर (Police Rights Organization) पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष गोपाळ कच्छवे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, जिल्हाध्यक्ष संतोष भाले, जिल्हा महिला उपाध्यक्ष शोभाताई जाधव, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार शिसोदिया, गंगाखेड तालुकाध्यक्ष अच्युत वाघमारे, तालुका कार्याध्यक्ष मधुकर कदम, तालुका संपर्कप्रमुख ओमप्रकाश कराळे, महिला तालुकाध्यक्ष माया कांबळे, शहराध्यक्ष राजश्री उफाडे, शुभांगी ढवळे, सुलोचनाताई गिरी, सुनिता घाडगे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष शामराव साखरे, शिवाजी चव्हाण, इंद्रजीत हाके, पप्पू मेहत्रे, निळकंठ कांबळे, मुंजाजी घुले आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.