परभणी/मानवत (Parbhani):- बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तातरानंतर हिंदू (hindu)विरूध्द होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मानवत तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांच्या वतीने उद्या मंगळवारी १० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मूकमोर्चा काढत मानवत बंदचे आवाहन करण्यात आले असून या मूकमोर्चाला व मानवत बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला असल्याची माहीती व्यापार महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे पाटील यांनी दैनिक देशोन्नतीशी (Dainik Deshonnati)बोलताना दिली.
सकल हिंदु समाजाच्या वतीने आयोजन
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकत कट्टरपंथियांनी बांगलादेशवर ताबा मिळविला आहे. यातच बांगलादेशमध्ये राहणाऱ्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार (torture) होत आहेत. या अत्याचाराला कंटाळून बऱ्याच हिंदू बांधवांनी मृत्यूला कवटाळले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मानवत शहरासह ग्रामीण भागातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी १० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जुने दत्त मंदीर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार असून मानवत बंदची हाक देखील देण्यात आली आहे. या मूक मोर्चाला व मानवत बंदला शहरातील व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे.
परभणीतील मानवत तालुका बंद ची हाक
शनिवारी ७ डिसेंबर रोजी मानवत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व प्रतिष्ठाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष गणेश कुमावत, सचिव शैलेश काबरा, उपाध्यक्ष गिरीष कत्रूवार, अशोक कुटे, शाम झाडगावकर, सहसचिव कपिल उदावंत, किरण कच्छवे, कोषाध्यक्ष रामनिवास सारडा, सहकोषाध्यक्ष पंकज लाहोटी, समन्वयक संजय बांगड, सल्लागार संजय लड्डा, सुरेश काबरा, वामनराव कोक्कर, वल्लभसेठ मंत्री, दत्तप्रसाद बांगड, कृष्णा बाकळे, राजू खके उपस्थित होते. मूकमोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मूक मोर्चा व मानवत बंद ठेवण्याच्या संदर्भात पोलीस निरीक्षक संदीप बोरकर व तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना ही निवेदन देण्यात आले आहेत.