पूर्णेच्या रेल्वे वसाहतीतील घटना; पोलीसांत नोंद
पूर्णा (parbhani news) : परभणीच्या पूर्णा येथील (Railway Colony) रेल्वे वसाहतीत राहणा-या एका ३८ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचा नग्नावस्थेत असलेला मृतदेह आढळून आला असल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. रेल्वे वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, सदरील कर्मचाऱ्याचा मृत्यू कशामुळे झाला असावा, अशा चर्चेला उधाण आले आहे.
दिनेश कुमार पाल वय ३८ वर्षे रा.खंडवा (मध्यप्रदेश) असे त्या मयत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. दिनेश कुमार हा मागील काही वर्षांपासून (Nanded Railway) नांदेड रेल्वे विभागाच्या सिग्नल अँड टेलीक्म्युनिकेशन विभागात खलाशी म्हणून कार्यरत होता. तो येथिल रेल्वे काॅलनीत आर बी१ /१३८ गल्लीतील १ नंबर कार्टर मध्ये एकटाच वास्तव्यास होता. मागील दोन ते तीन दिवसांपासून तो शेजारच्यांनाही दिसला नसल्याने तसेच त्याच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने स्थानिक रहिवाशांना शंका आली. काहींनी त्याचे खोलीत जाऊन पाहिले असता तो नग्नावस्थेत खोलीत मृतावस्थेत पडलेला आढळून आला. घटनेची माहिती (Purna Police) पूर्णा पोलीसांना देण्यात आली
घटनास्थळी (parbhani Police) सपोनि दर्नन शिंदे , फौजदार बाबासाहेब लोखंडे , पोकाॅ. नरेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे मात्र नक्की समजू शकले नाही. (Purna Police) पूर्णा पोलिस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी (Purna Police) पूर्णा पोलीसांनी घटनेची नोंद केली आहे.