परभणी(Parbhani) :- शहरातील साखला प्लॉट येथील सराईत आरोपी ताडीवाला अशोक मारोतराव शिंदे याला एमपीडीए (MPDA)कायद्यांतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारागृह(Central Jail) छत्रपती संभाजी नगर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. सदर आरोपीवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मंजुरी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा प्रस्ताव परभणी जिल्हाधिकारी यांचे आदेश..!
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक ए.एम. पठाण यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. सराईत आरोपी ताडीवाला अशोक मारोतराव शिंदे हा त्याच्या राहत्या घरी बेकायदेशीर रित्या विषारी ताडी निर्मिती करत होता. सदर इसम सराईतपणे बेकायदेशीरकृत्य करत होता. त्याच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. संबंधिताकडून चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र देखील घेतले होते. मात्र त्याचे गुन्हेगारी कृत्य कमी होत नव्हते. त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करावी या बाबत निरीक्षक ए.एम. पठाण यांनी अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून अशोक शिंदे याला छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.