परभणी/जिंतूर (Parbhani):- शहरातील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा बुजवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून विविध सामाजिक संघटनांनी(Social organizations) अनेकवेळा निवेदन देऊन त्याच्या बातम्याही प्रसिद्ध होऊनही रस्ते प्राधिकरण मंडळाला जाग येत नसल्याने शनिवार दि 20 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील तरुणांनी एकत्र येत ‘भीकमांगो आंदोलन’ करीत पदरमोड करून या खड्ड्यात मुरूम टाकून बेशरमाची झाडे लावून तो खड्डा बुजवत अनोखे आंदोलन केले.
खड्ड्यात मुरूम टाकून बेशरमाची झाडे लावून तो खड्डा बुजवत अनोखे आंदोलन
याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा निर्माण झाला होता. या खड्ड्यातून वळण रस्ता असल्याने रात्रीच्या वेळी अनेक वाहनचालकांना हा खड्डा दिसत नसल्याने या ठिकाणी दररोज लहान, मोठे अपघात होऊन त्यात कित्येक जण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याच रस्त्यावर शाळा, मंगल कार्यालय, शिकवणी वर्ग असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थ्यांचीही मोठी ये जा असते अनेक विद्यार्थ्यांच्या सायकली खड्ड्यात पडून ते गंभीर जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. रहदारीस अडचणीचा ठरणारा हा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी शहरातील काही संघटनांनी, तरुणांनी लावून धरली होती.
हा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी शहरातील काही संघटनांनी, तरुणांनी लावून धरली
तरीसुद्धा रस्ते प्राधिकरण महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याने शनिवारी दुपारच्या सुमारास बालाजी शिंदे सोसकर, बाळासाहेब काजळे, गजानन वाघमारे खैरीकर, अँड माधव दाभाडे, पिंटू रोकडे,परमेश्वर देशमुख, विठ्ठल काळे,रमेश डोंबे,अशोक भांबळे, उत्तम डोंबे,विजय देवकर,अनिल गाडेकर,शरद ठोंबरे,जुनैद मिर्जा,शेख अमन आदी तरुणांनी एकत्र येत या रस्त्यावरून जाणाऱ्या, येणाऱ्या वाहनचालकांकडे भीकमांगो आंदोलन करत काही पैसे जमा केले व त्यानंतर पदरमोड करून या खड्ड्यात मुरूम टाकून बेशरमाची झाडे लावून खड्डा बुजवला.
शासन झाले भिकारी म्हणून आम्ही गेलो जनतेच्या दारी- बाळासाहेब काजळे
राज्य सरकार हे राज्यातील महिलांसाठी,सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध योजना राबवून त्यांना महिन्याला ठराविक रक्कम देण्याचे जाहीर केले आहे परंतु शहरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळी या खड्ड्यात लाडकी बहीण, लाडका दाजी, लाडका भाऊ प त्याचे हातपाय मोडल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या पैशावर रुग्णालयाचा खर्च भागत नसल्याने आम्ही जनतेकडून भीक मागून, पदरमोड करत हा खड्डा बुजवला असून उर्वरित महामार्गावरील खड्डे रस्ते विकास प्राधिकरण महामंडळ व सार्वजनिक बांधकाम बुजवावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब काजळे यांनी दिला