परभणी (Parbhani):- आगामी विधानसभा निवडणुकीच्या(assembly elections) अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे शुक्रवार २६ जुलै रोजी परभणी दौर्यावर येणार असून यांच्या उपस्थितीत निष्ठावंतांचा मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती राकाँचे जिल्हाध्यक्ष माजी आ. अॅड. विजय गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत(press conference) दिली.
आ.जयंत पाटील हे शुक्रवार २६ जुलै रोजी परभणी दौर्यावर येणार
शहरातील महात्मा फुले विद्यालयात बुधवार २४ जुलै रोजी सकाळी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अॅड. विजय गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्ष मनिषा केंद्रे, तालुकाध्यक्ष गंगाधर जवंजाळ, विकास लंगोटे, संतोष बोबडे, युवक अध्यक्ष रितेश काळे, अजय गव्हाणे, रमाकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना अॅड. गव्हाणे म्हणाले की, महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे शुक्रवार २६ जुलै रोजी परभणी दौर्यावर येणार आहेत. यामध्ये ते लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या (assembly elections) अनुषंगाने कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी १:३० नंतर जिल्ह्यातील चारही विधानसभानिहाय आढावा बैठक संपन्न होईल
आ.जयंत पाटील हे गुरुवार २५ जुलैच्या रात्रीच शहरात येतील. शुक्रवार २६ जुलै रोजी सकाळी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पुष्पहार अर्पण करतील व दर्गा येथे भेट देतील. त्यानंतर राष्ट्रवादी भवनात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडेल. दुपारी १:३० नंतर जिल्ह्यातील चारही विधानसभानिहाय आढावा बैठक संपन्न होईल. त्यानंतर ४:०० वाजता माध्यमांशी संवाद साधतील. सायंकाळी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर जनसंवाद यात्रा पार पडेल. यावेळी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.