परभणी/पाथरी(Parbhani):- माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्हा नोंद प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी समर्थकांनी केलेल्या आवाहनानंतर पाथरी शहरात बुधवार १४ ऑगस्ट सकाळ पासुन कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळी फीत शहरातून शांततेत रॅली काढत माजी आ.दुर्राणी यांच्यावरील दाखल गुन्हे प्रशासनाला मागे घेण्यासंदर्भात मागणी केली आहे.
समर्थकांनी शांततेत रॅली काढत दिले प्रशासनाला निवेदन
रात्री शहरातील ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण कांबळे यांचा मृतदेह (dead body)मंगळवार 13 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या शेतातील आखाड्यावर आढळून आला होता. यानंतर याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची (Sudden death) नोंद करण्यात आली होती. दुपारी पाथरी पोलिसांनी पंचनामा दरम्यान मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळल्यानंतर आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह शहरातील विजय प्रभाकर वाकडे रा .भीमनगर यांच्यावर पाथरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता .यानंतर पाथरी मध्ये कमालीची तणावपूर्ण शांतता निर्माण झाली. मंगळवारी संध्याकाळी नऊ वाजता दुर्राणी यांच्या समर्थकांनी बुधवार १४ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी बंद ठेवण्याचे आवाहन केले होत. त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच शहरातील सर्वच बाजारपेठ बंद राहत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त
दरम्यान बुधवारी दुपारी बारा वाजता माजी आ. दुर्राणी यांच्या घरापासून शहर व ग्रामीण भागातील राकाँ शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत शांततेत रॅली काढली होती. यावेळी प्रशासनाला माजी आ. दुर्राणी यांच्यावर दाखल गुन्हे खोटे असल्याचे नमुद करत ते परत घेण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त (Police arrangements) तैनात करण्यात आला आहे. शहरातील सर्वच बाजारपेठेतील प्रतिष्ठाने बंद असून अत्यावश्यक सेवा सुविधा सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही सुरू आहे.