सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीचे आंदोलन
परभणी (Teachers Akrosh Morcha) : १५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन निर्णय ५ सप्टेंबर २०२४ रोजीचा २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील कंत्राटी भरती शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख व इतर प्रलंबीत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात बुधवार २५ सप्टेंबर रोजी (Teachers Akrosh Morcha) मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकार्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या (Teachers Akrosh Morcha) मोर्चाला जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा नंतर उपोषण मैदानावर पार पडलेल्या या सभेस मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात जवळपास १२ शिक्षक संघटनांनी सहभागी नोंदविला.
स्वराज्य शिक्षक संघटनेचे आंदोलन
विद्यार्थी व शिक्षक यांच्यावरील संच मान्यते बाबतचा तसेच कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख व इतर मागण्यांसाठी बुधवार २५ सप्टेंबर रोजी स्वराज्य शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. शासन निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. ही बाब लक्षात घेता सदरचे शासन निर्णय रद्द करावेत, या मागणीसाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. (Teachers Akrosh Morcha) आंदोलनात विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी सहभाग घेतला.