परभणी (Parbhani Police Bharti) : जिल्हा पोलीस दलात १४१ रिक्त पदांची भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून त्याची शारीरिक चाचणी बुधवार १९ जून पासून सुरू होणार आहे. ही भरती प्रक्रीया कृषि विद्यापीठातील अश्वमेध मैदानावर होणार आहे, अशी माहिती (Police Bharti) जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवार १७ जून रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत पोलीस भरती संबंधी माहिती देण्यात आली.
परभणी पोलीस भरती; कृषी विद्यापीठाच्या मैदानावर
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अशोक घोरबांड, पोनि. चव्हाण उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले की, परभणी जिल्हा पोलीस दलातील १११ पोलीस शिपाई (Police Bharti) आणि ३० चालक शिपाई या दोन पदासाठीची शारीरिक चाचणीची प्रक्रीया बुधवार १९ जून पासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील पदभरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांची आवेदन पत्रे मागविण्यात आली होती. त्यामध्ये ११ हजार ४ उमेदवारांनी ज्यात (Police Bharti) पोलीस शिपाई १११ पदासाठी ६ हजार ४६४ आणि पोलीस चालक ३० पदासाठी ४ हजार ५४० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
१९ जून पासून सुरू होणार भरती प्रक्रिया
उमेदवारांना पावसामुळे ऐनवेळी अडचण येऊ नये म्हणून जिल्हा (Police Headquarters) पोलीस मुख्यालयाच्या मैदाना ऐवजी ही प्रक्रीया वसंतराव नाईक मराठवाडा (Agricultural University) कृषि विद्यापीठाच्या अश्वमेध या मैदानावर प्रत्येक दिवशी १ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी बदललेले ठिकाण लक्षात घेऊन ज्या दिवशी शारीरिक चाचणी असेल त्या दिवशी पहाटे ४.३० च्या अगोदर मैदानावर उपस्थित राहावे. ही संपूर्ण प्रक्रीया आधुनिक तंत्रज्ञान आरएफआयडी, सीसीटिव्ही निरीक्षणाखाली पार पडणार आहे. या संपूर्ण काळात पोलीस अधीक्षक (Police Bharti) आणि अप्पर पोलीस अधीक्षक हजर असणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच कोणी अनुचीत प्रलोभन दाखवत असल्यास (Police Administration) पोलीस प्रशासनाकडे संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केले.
वाहतूक, मॉर्निंग वॉक बंद
भरती प्रक्रिया कालावधीत विद्यापीठात येणार्या जाणार्या नागरीकांना, वाहतुकीला बंद करण्यात आली आहेत. तसेच मॉर्निंग वॉकला येणार्या नागरीकांनासाठी ही बंद असणार आहे.
एकाच वेळी दुसर्या पदाची शारीरिक चाचणी
जर उमेदवारांची एकाच वेळी दुसर्या पदाची शारीरिक चाचणी होणार असल्यास उमेदवाराने योग्य पुरावे सादर केल्यास, त्यास दुसरी (Police Bharti) शारीरिक चाचणीची तारीख देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी जिल्हा (Police Administration) पोलीस प्रशासनाकडे तशी विनंती करणे गरजेचे आहे.