परभणी/गंगाखेड (Bhoi Samaj) : तालुक्यातील मौजे दुस्सलगाव शिवारात गंगाखेड परभणी रस्त्यालगत मासे विक्री करण्यासाठी पोलीस अधिकारी विरोध करीत असल्याची तक्रार येथील Bhoi Samaj भोई समाज बांधव व ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आज (Gangakhed Tehsil Office) तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
परभणीच्या पोलीस मासे विक्री करु देत नसल्याची तक्रार
तालुक्यातील दुस्सलगाव येथील कहार व Bhoi Samaj भोई समाज बांधव गोदावरी नदी व तलावात मासेमारी करून मासे विक्री व्यवसाय करत आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत असल्याचे व नदी पात्रात पकडलेले मासे गंगाखेड परभणी रोडच्या (Parbhani police) कडेला मौजे दुसलगाव शिवारात वर्षांनु वर्षांपासून मासे विक्री करत असल्याचे निवेदनात नमूद करून या व्यवसायाला ग्राम पंचायत किंवा मच्छीमार संस्थेची कसलीही हरकत नाही. मासे विक्री व्यवसायामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहन धारकांनाही कोणतीच अडचण होत नसून कायदा व सुव्यवस्थेला सुद्धा बाधा पोहोचत नसतांना ही (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्याचे पो. नि. दिपककुमार वाघमारे हे मात्र दुस्सलगाव शिवारात गंगाखेड परभणी रस्त्याच्या बाजूला मासे विक्री करू देत नाही व येथील मासे विक्री बंद करा, असे म्हणत आहे.
गंगाखेड येथील भोई समाज बांधवांचे निवेदन
मासे विक्री बंद नाही केल्यास तुमच्यावर गुन्हेगारी कट केल्याचा व कायद्याचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने मासे विक्री केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप करून भोई समाज बांधवांचा मासे विक्री व्यवसाय बंद झाल्यास आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल, असे म्हणून मासे विक्री केल्यानंतरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालवा. यासाठी तहसीलदार साहेबांनी (Bhoi Samaj) भोई समाज बांधवांना न्याय द्यावा, अशी विनंती करत अन्यथा या अन्यायाविरुद्ध ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तहसील कार्यालय अथवा दुस्सलगाव शिवारात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोडे, भाई गोपीनाथ भोसले, भारत कचरे, वरागिरी कचरे, गोपीचंद भूंगासे, नामदेव कचरे, गंगाधर कचरे, यशोदा गहिरे, देवमन कचरे, नवनाथ कचरे, बाबासाहेब बिजुले, रामचंद्र खिरे, चुडाराम कचरे, परमेश्वर कचरे, आश्रोबा कचरे, सूरज खिरे, दशरथ कचरे, राजेभाऊ भुंगासे, राम गहिरे आदींसह सुमारे ३० ते ३५ मच्छीमार (Bhoi Samaj) भोई समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाच्या प्रती परभणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, गंगाखेड, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, विशेष पोलीस महासंचालक व गृह राज्यमंत्री यांच्या नावे देण्यात आले आहे.