देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Parbhani Police) : बहुचर्चित असलेल्या पेडगाव येथील बोगस खत प्रकरणातील (Bogus fertilizer case) आरोपी तब्बल वीस दिवसांपासून अद्यापही फरारच आहेत. ग्रामीण पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, तत्पूर्वी त्या आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता कोर्टाकडे धाव घेतली असून ग्रामीण पोलिसांनी त्या आरोपींचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळण्यात यावा असे कोर्टाला सांगितले आहे.त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसात आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील, असे (Parbhani Police) ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
अटकपूर्व जामिनासाठी आरोपींची कोर्टाकडे धाव
तालुक्यातील पेडगाव येथील माऊली कृषी केंद्रावर कृषी विभागाने (Agriculture Department) टाकलेल्या धाडीत त्यांना येथे बनावट रासायनिक खत (Fake chemical fertilizers) आढळून आले होते. त्यानंतर कृषी विभागाने माऊली कृषी केंद्र चालक तसेच परळी येथील रणजीत देशमुख व दत्तराव देशमुख या तीन आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात २९ मे रोजी तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून सदर आरोपी फरार असल्याने जिल्ह्यामध्ये या आरोपींनी किती बनावट खताच्या बॅग विक्री केली आहे हे समजणे कठीण झाले आहे. पोलिसांची या आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम चालूच असून सदरील आरोपींनी त्यांना अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता कोर्टाकडे धाव घेतली असून, (Parbhani Police) ग्रामीण पोलिसांनी मात्र कोर्टाला सदरील आरोपींना जामीन मंजूर करू नये असे सांगितले आहे.
पुढील चार दिवसात आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पेडगाव बोगस खत प्रकरणातील (Bogus fertilizer case) आरोपींचा आमच्याकडून शोध चालू आहे. मात्र अद्यापही ते फरारच आहेत. त्यांनी कोर्टाकडे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज केला आहे. मात्र आम्ही त्यांना अटकपूर्व जामीन मिळू नये, असे कोर्टाला सांगितले आहे. मात्र पुढील तीन ते चार दिवसात आरोपी (Parbhani Police) पोलिसांच्या ताब्यात असतील.
– जयप्रकाश गुट्टे, पोलीस निरीक्षक, ग्रामीण