पोलीस अधीक्षकांनी दिले निर्देश
परभणी (Parbhani Police) : स्कूल बस वाहनामधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक कराल तर कारवाई होईल, असा इशारा (Parbhani Police) पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे. जिल्हा स्कूल बस सुरक्षिततेची बैठक शुक्रवार ९ ऑगस्ट रोज सकाळी अकरा वाजता पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी निर्देश दिले.
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता बैठक
या बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, शिक्षणाधिकारी, (Parbhani Police) पोलीस निरीक्षक, जिल्हा परिवहन समिती अध्यक्ष रविंद्रसिंह परदेशी यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे वाहतूक करण्याच्या अनुषंगाने स्कूल बस नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. (District School Bus) विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने सुस्थितीत असावीत, चालकाकडे आवश्यक कागदपत्र असावे, शाळेचे प्राचार्य, पालक यांनी वाहन चालकाचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासल्या शिवाय त्याच्या हातात वाहन देऊ नये, आरटीओ व वाहतूक पोलिसांनी नियमित वाहनांची तपासणी करावी, क्षमते पेक्षा जास्त मुलांची वाहतूक करणार्या वाहनांवर कडक कारवाई करावी असे निर्देश दिले.
वाहनावर वाहन मालकाचा मोबाईल क्रमांक टाकावा
विद्यार्थ्यांची वाहतूक (District School Bus) करणार्या वाहनावर वाहन मालकाचा मोबाईल क्रमांक वाहनाच्या मागे टाकावा, वाहन चालक रॅश ड्रायव्हिंग करत असेल तर याची माहिती वाहन मालकाला द्यावी, (Parbhani Police) पोलिसांशी संपर्क साधावा, दर तीन महिन्यांनी समितीची बैठक घेण्याचे निर्देश सर्व सदस्यांना देण्यात आले. तसेच मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजीत करुन जनजागृती करण्याचे सांगण्यात आले.