पोलीस कर्तव्य मेळाव्यात प्रथम क्रमांक
परभणी (Parbhani Police) : जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक (Bomb disposal squad) व नाशक पथकात कार्यरत असलेल्या (Dog Rio passed away) श्वान रिओ याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्याने पोलीस दलात सात वर्ष एक महिना एवढी सेवा बजावली. सोमवारी सायंकाळी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. बॉम्ब शोधक नाशक पथकात कार्यरत असताना नांदेड परिक्षेत्रात (Parbhani Police) पोलीस कर्तव्य मेळाव्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
बॉम्ब शोधक नाशक पथकात होता कार्यरत
त्याच प्रमाणे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि इतर महत्वाच्या व्यक्तींच्या सभेवेळी आपली सेवा दिली होती. (Parbhani Police) परभणी बरोबर, नांदेड, यवतमाळ या ठिकाणीही बंदोबस्तात सहभाग घेतला. (Dog Rio passed away) श्वान रिओ याला मानवंदना देतेवेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधीकारी, दिनकर डंबाळे, पोनि. रविकुमार बानते, विजय मुंडे, सपोनि. अनिल कुरुंदकर, सिता वाघमारे, साहेबराव तोटेवाड यांची उपस्थिती होती.