पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी शुक्रवारी काढले आदेश
परभणी (Parbhani Police) : जिल्हा पोलीस आस्थापनेवरील ८३ पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय कारणांवरुन बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी या बाबत शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी आदेश काढले आहेत. पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२४ करीता सर्वसाधारण बदल्यांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. ज्या पोलीस अंमलदारांची एकाच ठिकाणी पाच किंवा यापेक्षा अधिक वर्ष सेवा झाली असेल, असे (Parbhani Police) पोलीस अंमलदार बदलीसाठी पात्र होते.
या अंमलदारां कडून बदलीकरीता पसंती मागविण्यात आली होती. शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी समुपदेशन प्रक्रियेने बदल्या करण्यात आल्या. या मध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई, चालक आदी संवर्गातील ८३ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अंमलदारांना त्यांच्या कडील कामकाजाचे हस्तांतरण करुन बदलीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करावे, अशा सूचना आदेशामध्ये देण्यात आल्या आहेत.
समुपदेशन पध्दतीने प्रक्रिया
पोलीस कर्मचार्यांच्या (Parbhani Police) बदल्यांसाठी शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. बदली पात्र अंमलदारांनी दिलेले ठिकाणी आणि रिक्त असलेल्या जागानुसार समुपदेशन करत बदलीची प्रक्रिया राबविण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत समुपदेशन सुरू होते.