कायदेशिर कारवाई करण्याचा पोलीस प्रशासनाकडून इशारा
परभणी (Parbhani Social media) : राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये घडत असलेल्या घटना, घडामोडींबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन (Parbhani Police) पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Social media) समाज माध्यमांवर पोलिसांची करडी नजर असून जातीय अगर धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट, कमेंट केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मागील काही दिवसात समाज माध्यमांवर विविध पोस्ट प्रसारीत केल्या जात आहेत. यामुळे सामाजिक वातावरण दुषित होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून नागरीकांकडून आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यात मागील काही दिवसात विविध जिल्ह्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण होऊन वातावरण दुषित होईल, अशा घटना घडल्या आहेत. या घटनांचा परिणाम समाज माध्यमांवरही दिसत आहे. (Social media) समाज माध्यमांद्वारे तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारीत केल्या जात आहे.
अशा संदेशांवर पोलीसांची बारीक नजर आहे. परभणी जिल्ह्यातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, सामाजिक वातावरण सलोख्याचे राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन (Parbhani Police) पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.