परभणी ग्रामीण पोलीसात मुलीने दिली आई-वडील, सासू-सासर्याविरुध्द तक्रार
परभणी (Parbhani Police) : नवर्याच्या त्रासाला कंटाळून (Husban troubles) विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार दिली. समुपदेशना दरम्यान विवाहितेला तिचा बालविवाह झाल्याचे समजले. या नंतन पीडितेने परभणी ग्रामीण पोलीस ठाणे गाठत सोमवार ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून आई – वडील, सासू – सासर्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साडे एकोणविस वर्ष वय असलेल्या मुलीचे लग्न सन २०२० मध्ये बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे झाले होते. लग्नानंतर पीडिता सासरी बँक कॉलनी, मुक्तेश्वर रोड, औसा जिल्हा लातूर या ठिकाणी राहवयास गेली. लग्नानंतर काही दिवसांनी (Husban troubles) नवर्याने विवाहितेला त्रास देण्यास सुरूवात केली. या नंतर विवाहिता जानेवारी २०२१ पासून परभणी तालुक्यातील रायपूर येथे आई – वडीलांकडे वास्तव्याला आहे. विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार अर्ज दाखल केला. समुपदेशनामध्ये नवर्याने नांदविण्यास नकार दिला. या दरम्यान विवाहितेला तिचे लग्न अल्पवयात झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर विवाहितेने ग्रामीण पोलीस ठाणे गाठत आई – वडील, सासू – सासर्याविरुध्द तक्रार दिली आहे. (Parbhani Police) पोलीस अधिक तपास करत आहेत.