परभणी/ताडकळस (Parbhani Police) : येथील पोलिस ठाण्यात नुकतेच रुजु झालेले (Parbhani Police) सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंद्याविरूध्द कारवाईला सुरुवात केली असून लोहगाव येथे अवैधरित्या चोरट्या मार्गाने गुटखा (illegal Gutkha) विक्री करणाऱ्या आरोपींकडून गोवा,विमल,राजनिंवास, आर.एम.डी. असे महाराष्ट्र शासनाने व अन्न प्रशासन आयुक्तांनी प्रतिबंधीत केलेला असा एकुण ३३ हजार ६७८ रुपयांचा माल जप्त करुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल (Parbhani Crime) करण्यात आला आहे.
माहितीनुसार, ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती सपोनि गजानन मोरेillegal Gutkha यांना मिळाली. या माहितीवरून गुरुवार २५ जुलै रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास लोहगाव येथील जायकवाडी प्लाँटमधील पडिक जागेत आरोपी रफिक अब्दुल रौफ शेख यांने महाराष्ट्र शासनाने व अन्न प्रशासन आयुक्तांनी प्रतिबंधीत केलेले व जीवीतास हानी पोहचविणारे विषारी पदार्थ (illegal Gutkha) असलेले राजनिवास सुंगधीत पान मसाला ३० पुडे किमंती ५७६०रुपये, जाफरानी जर्दा ५० पुडे किमंती २५९२रुपये, गोवा ३० पुडे किमंती ६३००रुपये, केसर युक्त विमल पान मसाला ५२ पुडे किमंती ६२४०रुपये ,सुंगधीत तंबाखू ५२ पुडे किमंती १५६०रुपये,आर .एम.डी.पान मसाला ४ पुडे किमंती २४०० रुपये, केसर युक्त विमल पान मसाला किंग पँकचे ३ पुडे किमंती ५९४ रुपये, व्हि १ सुगंधीत तंबाखूचे ६ पुडे किमंती १३२ रुपये, तीन सिलबंध खुल्या सुंगधीत तंबाखूचे एक किलो ३ पुडे किमंती २१०० रुपये, व अन्य १० पुडे किमंती ६००० रूपये असा एकुण ३३ हजार ६७८ रूपयांचा अवैध गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई सपोनि गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे, भास्कर बर्गे,पोकाँ, दत्ता जाधव, मपो रेखा शिंगे,राम सोळंके आदी पोलीस कर्मचार्यांनी केली. या प्रकरणी सपोउपनि.भास्कर बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात आरोपी रफिक अब्दुल रौफ शेख व ज्ञानेश्वर उर्फ सोनु दादाराव बारखुदे रा.आंबेटाकळी ता.गंगाखेड यांच्या विरुद्ध कलम अन्न सुरक्षा व मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास (Parbhani Police) पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे हे करीत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा (illegal Gutkha) विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.