बामणी पोलीसात गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Police) : रात्र गस्तीवर असलेल्या पोलीसांना (Parbhani Police) संशय आल्याने त्यांनी टिप्परचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून भरधाव वेगात वाहन चालवत वाहन मागे घेण्याच्या प्रयत्नात टिप्पर भिंतीवर आदळून भिंतीचे नुकसान केले. ही घटना जिंतूर तालुक्यातील अंगलगाव येथे घडली. भरधाव वेगात वाहन चालविणे, (Illegal sand smuggling) वाळुची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी (Parbhani Police) बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वाळुची चोरटी वाहतूक
पोह. वसंत निळे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी व पोशि. कोकाटे रात्र गस्तीवर होते. त्यांना अंगलगाव येथे एक संशयीत टिप्पर दिसून आला. (Parbhani Police) पोलीसांनी त्याचा पाठलाग केला असता त्यांना पाहून टिप्पर चालकाने वाहन मागे घेतले. यात गावातील एका घराच्या भिंतीला वाहन धडकले. यामध्ये भिंतीचे ३० हजाराचे नुकसान झाले. पोलीसांनी वाहन थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये वाळू दिसून आली. (Illegal sand smuggling) वाळू विषयी चालकाला विचारणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. (Parbhani Police) पोलीसांनी एमएच २२ एए २४०१ हे वाहन ताब्यात घेतले. सदर प्रकरणी भागवत घुले याच्यावर बामणी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.