परभणीतील गंगाखेड शहरातील मुख्य रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
परभणी/गंगाखेड (Parbhani police) : शहरातील मुख्य रस्त्यावर बाजार पेठेत बेशिस्त थांबणारे ऑटो, दुचाकी, चार चाकी वाहने व हातगाडे चालकांना वाहतूक शाखेच्या (Parbhani police) पोलिसांनी शिस्त लावल्याने बाजार पेठेतील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गंगाखेड शहरातील व्यापार पेठेतील मुख्य रस्त्यावर पोस्ट ऑफिस कार्यालयापासून ते भगवती चौक दरम्यानच्या सराफा लाईनमधील व्यापाऱ्यांनी तसेच भगवती चौक ते दिलकश चौक दरम्यान व तेथून पुढे पोलीस ठाण्या पर्यंतच्या व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर ओटे करून त्यावर ठेवलेल्या दुकानातील साहित्यामुळे तसेच याच रस्त्यावर बेशिस्तपणे थांबणाऱ्या ऑटो, दुचाकी, चार चाकी वाहने व फळांच्या हातगाड्यामुळे दिलकश चौक, डॉ. हेडगेवार चौक, शहीद भगतसिंग चौक परिसरात आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याच्या वाढत्या तक्रारीमुळे बाजार पेठेतील मुख्य रस्त्यावर होत असलेली ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी (Parbhani police) पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे स.पो.उप.नि. वैजनाथ आदोडे, पोलीस शिपाई प्रशांत वावळे यांनी (गृहरक्षक दलाचे जवान) होमगार्ड यांना सोबत दि. १२ सप्टेंबर रोजीपासून विशेष मोहीम राबवित राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात बेशिस्त थांबणाऱ्या दुचाकी, चार चाकी वाहनांसह फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यांना शिस्त लाऊन हातगाडे चालकांबरोबर येथे बेशिस्तीत थांबणाऱ्या ऑटो चालकांचा ऑटो पॉइंट बदलून नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृह परिसरात लावल्याने सतत तुफान गर्दीत असणाऱ्या दिलकश चौक, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकासह शहरातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
वाहतूक (Parbhani police) पोलीसांनी राबविलेल्या या मोहीमेबद्दल बाजार पेठेत येणाऱ्या वयोवृद्धांसह महिला व सर्व शहर वासियांना पोलीसांचे कौतुक करत नगर परीषद प्रशासनाने ही याची दखल घेत बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी रहदारीस अडथळा निर्माण अशा पद्धतीने दुकानासमोर बांधलेले ओटे काढून घ्यावे अशी मागणी शहर वासीयांनी केली आहे. त्याचप्रमाणे गंगाखेड शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस ठाण्यातील वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी राबविलेली मोहीम सतत चालू ठेवावी अशी मागणी ही शहर वासीयांतून केली जात आहे.