परभणी शहरातील गुलजार कॉलनीमधील घटना
परभणी (Parbhani Police) : माझ्या प्लॉटवर बांधकाम का करत आहेस, असे विचारल्यावर चौघांनी मिळून (Parbhani Crime) एकावर हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना परभणी शहरातील गुलजार कॉलनी भागात २० मे रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी २३ मे रोजी (Nanalpet Police Station) नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद असलम मोहम्मद इलियास यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे २० मे रोजी पत्नीसोबत गुलजार कॉलनी येथील प्लॉटवर गेले होते.
चौघांवर नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल
या ठिकाणी काहीजण प्लॉटवर बांधकाम करत असल्याचे दिसले. संबंधितांना फिर्यादीने माझ्या प्लॉटवर बांधकाम का करता अशी विचारणा केल्यावर त्यांनी शिवीगाळ करत थाबडबुक्यांनी मारहाण केली. (Parbhani Crime) जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मोहम्मद अलताफ, मोहम्मद अफरोज, मोहम्मद फयाज, नसरीन या चौघांवर (Nanalpet Police) नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.