चारचाकी वाहनातून दारुची वाहतूक
परभणी (Parbhani Police) : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने (Parbhani Crime Squad) शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास (Parbhani Police) दैठणा पोलीस ठाणे हद्दीत पाथरी रोडवर इंदेवाडी फाटा येथे केलेल्या कारवाईत १ लाख ३ हजार ३४० रुपये किंमतीच्या देशी, विदेशी दारू सह एक चारचाकी वाहन मिळून ४ लाख ३ हजार ३४० रुपयांच मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण ३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थनिक गुन्हा शाखा पथकाची पाथरीच्या इंदेवाडी फाटा येथे कारवाई
स्थागुशाचे पोनि अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजू मुत्तेपोड, पोलीस अंमलदार रवि जाधव, शेख रफीक, निलेश परसोडे यांच्या पथकाने कारवाई केली. पोलीसांनी दैठणा पोलीस ठाणे हद्दीत इंदेवाडी फाटा येथे एमएच ०४ जीडी ३६२६ या क्रमांकाची इंडिका विस्टा गाडी ताब्यात घेतली. या गाडीमध्ये ७३ हजार ९२० रुपये किंमतीची देशी दारू तसेच विदेशी दारू मिळून आली. १ लाख ३ हजार ३४० रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी (Parbhani Police) दैठणा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.