परभणीत साडे सहालाखाचा मुद्देमाल जप्त
परभणी (Parbhani Police ) : स्थानिक गुन्हे शाखेच्या (crime branch) पथकाने गंगाखेड रोडवर कृष्ण चैतन्य हॉटेलच्या बाजुला एका पत्राच्या शेडमध्ये अंदर बाहर नावाचा जुगार खेळत बसलेल्या जुगार्यांवर छापा टाकला. या कारवाईत रोख 82 हजार, मोबाईल आणि दुचाकी मिळून 6 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Police) पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने पोनि. अशोक घोरबांड, सपोनि. राजु मुत्तेपोड, पोलीस अंमलदार मोहन लाड, हुसेन पठाण, इंद्रजितसिंग बावरी, निलेश परसोडे यांच्या पथकाने कारवाई केली.
परभणी स्थानिक गुन्हे शाखेची गंगाखेड रोडवर जुगार्यांवर कारवाई
स्थागुशाचे छापा टाकून जुगार्यांजवळील मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सुधीर दासा लोखंडे, श्रीनिवास माधवराव नारलावार, बालासाहेब देवराव सावळे, गंगाधर कदिरप्पा पत्तीकोंडा, दिगंबर नागोराव झाटे, महेश माधवराव फरकंडकर, तुकाराम संतराम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पळून गेलेले फरार चौदा इसम, क्लब चालक कलीम कुरेशी आणि जागा मालक अशा एकूण 24 इसमांवर (Parbhani Police) परभणी ग्रामीण पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.