परभणी(Parbhani):- पोलीस (Police)आस्थापनेवरील वार्षिक बदल्यांची प्रक्रिया थंड बस्त्यात गेल्याचे दिसत आहे. एप्रिल – मे महिन्यात अर्ज मागविल्या नंतरही अद्यापही बदल्या झालेल्या नाहीत. जुलै महिना संपत आला असून बदल्या न झाल्याने पोलीस अंमलदार बुचकळ्यात पडले आहेत.
सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया रखडली
एकाच ठिकाणी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यावर पोलिसांच्या बदल्या करण्यात येतात. वार्षिक बदल्यांसाठी पात्र असलेल्या पोलिसांकडून दरवर्षी अर्ज मागविल्या जातात. यावर्षीच्या सर्वसाधारण बदल्यांकरीता एप्रिल – मे महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. अर्जावर कर्मचार्यांना तीन ठिकाणचे पसंती क्रम द्यावे लागतात. अर्ज आल्यानंतर महिनाभराच्या आत बदल्या केल्या जातात. दरवर्षी १५ जून पर्यंत पोलीस अंमलदारांच्या बदल्या होतात. यावर्षी मात्र जुलै महिना संपत आला तरी बदल्यांची प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे बदलीसाठी पात्र असलेले पोलीस अंमलदार (executive) बदल्या कधी होतात, याच्या प्रतीक्षेत आहेत.