परभणी/ताडकळस (Parbhani Police) : येथील पोलिसांच्या पथकाने पोलीस ठाणे हद्दित पूर्णा तालुक्यातील कमलापुर येथे केलेल्या कारवाईत एका घरातून दोन पिस्तूल जप्त केले. एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास करण्यात आली.
सपोनि.मोरे, सपोउपनि. बर्गे, घुगे, पोह. तावरे, चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली. कमलापुर येथे एकाने आपल्या घरी हत्यार लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी कारवाई करत दोन पिस्तूल जप्त केले. या प्रकरणी सपोउपनि. भास्कर बर्गे यांच्या फिर्यादीवरुन चंद्रकांत दत्ता पवार रा. गोपालवाडी ता. मुदखेड जि. नांदेड ह.मु. कमलापुर ता. पूर्णा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Police) ताडकळस पोलीस अधिक तपास करत आहे. संबंधिताने सदरचे हत्यार नेमके कोणाकडून आणले होते, या विषयी तपास केला जात आहे.