परभणीलाही तीन जण आले
परभणी (Parbhani Police) : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष (Parbhani Police) पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची लातूरला तर पोनि वसंत चव्हाण यांची नागपूर शहरला बदली झाली आहे. या बदलांच्या आदेशामध्ये इतर तीन अधिकारी परभणी जिल्ह्या करिता आले आहेत. राज्यातील पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सायंकाळी उशिरा टाकण्यात आले. या आदेशात (Parbhani Police) परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष अशोक घोरबांड यांची बदली लातूर येथील (Police Training Centre) पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी झाली आहे. तर पोनि वसंत चव्हाण यांची बदली नागपूर शहर या ठिकाणी झाली आहे. अशोक घोरबांड यांचा विभागातील कार्यकाळ संपला असल्यामुळे बदली करण्यात आली आहे.
पोनि.वसंत चव्हाण यांची नागपूर शहर येथे बदली
घोरबांड यांचा अनुभव (Parbhani Police) परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात सर्वोत्तम राहिला आहे. गुन्हेगारांवर त्यांची चांगली पकड असल्यामुळे त्यांना सिंघम म्हणून संबोधले जाते. कुठलीही परिस्थिती आल्यास हाताळण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. दोन अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी इतर तीन अधिकारी (Parbhani city) परभणी जिल्हा करिता दाखल होणार आहे. त्यामध्ये बुलढाणा येथून जगदीश शिवाजी मंडलवार , पुणे शहर येथून मनोहर पंढरीनाथ इडेकर, धाराशिव येथून बाळासाहेब नारायण पवार यांचा समावेश आहे.