परभणी (Parbhani Police) : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्या अंतर्गत काम करणार्या नऊ पोलीस हवालदारांची (Police Administration) पोलीस प्रशासनाकडून सेवा ज्येष्ठतेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने सोमवार 3 जून रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार 9 हवालदारांची पदोन्नती समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे.
यामध्ये (Parbhani Police) नानलपेठ येथील रंगनाथ देवकर, चुडावा येथील प्रदिप हिरक, मानवत येथील विजय टाक, दैठणा येथील नागनाथ फड, पूर्णा येथील साहेब मानेबाईनवाड, नवा मोंढा येथील भारत कदम, पाथरी येथील शब्बीर खाँ पठाण, मोपवि. येथील चालक शेख कदीर अब्दुल हमीद आणि गंगाखेड येथील माणिक भोसले यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या (Police Administration) वतीने या विविध पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदारांची पोलीस सहाय्यक उपनिरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे.