परभणी(Parbhani):- जिल्हा पोलीस आस्थापनेवरील शिपाई आणि चालक शिपाई या पदाच्या 141 जागांसाठी बुधवारी 19 जून पासून परभणी शहरातील संत्रा नाईक मराठवाडा विद्यापीठ (Marathwada University)च्या अश्रमेद मैदानावर भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली पोलीस भरतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology) वापर केला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी देशोन्नतीशी डिजिटल (Digital Deshonnati)ला बोलताना सांगितले दररोज 1000 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे.
पोलीस भरतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर
एकूण 11 हजार04 उमेदवारांचे अर्ज आले आहेत धावणे गोळा फेक मैदानी चाचणी घेतली जात आहे. पावसाचा अंदाज असल्याने मैदान कोरडे राहावे यासाठी धावण्याचे ट्रॅक आणि घोडे फेक मैदानावर ताडपत्रीची सुविधा करण्यात आली आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा देण्यात आले आहेत संपूर्ण भारतीय प्रक्रिया हे सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेतून होत आहे.