परभणीतील पोलीस अधीक्षक धावले विद्यार्थींनीच्या मदतीला
परभणी (Parbhani Police) : शहरातील वसमत रोडवर असलेल्या राजगोपालाचारी उद्यानाजवळ काही महाविद्यालयीन तरुणींची छेड काढण्यात आल्याचा प्रकार ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडला. यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी स्वत: सदर विद्यार्थीनींच्या मदतीसाठी धावून आले. पोलिसांचे पथक आल्याने विद्यार्थीनींना देखील हिंमत मिळाली. या प्रकरणी (Parbhani Police) नवा मोंढा पोलिसात एका विरुध्द छेडछाड व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीने तक्रार दिली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास राजगोपालाचारी उद्यानात मोकळ्या जागेत जेवणासाठी बसलेल्या असताना त्यांच्याजवळ एक मुलगा आला. त्याने वाईट उद्देशाने मुलींना बोलला. मुलींनी त्याला उत्तर दिले नाही. रागात येऊन सदर युवकाने शिवीगाळ केली. या विषयी मुलींनी विचारणा केल्यावर संबंधिताने पुन्हा महाविद्यालयाजवळ किंवा उद्यानात दिसल्या तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. घाबरुन मुली पळाल्या असता यावेळी मानलेल्या भावाने मुलींना थांबविले. त्याने शिव्या देणार्या मुलाचे नाव सांगितले. मुलींनी पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाजवळ जात पोलिसांना बोलावले.
यावेळी (Parbhani Police) पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी स्वत: मुलींच्या मदतीसाठी धावून आले. स्थानिक गुन्हे शाखा, नवा मोंढा पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी मुलींना धिर दिला. या प्रकरणी महाविद्यालयीन विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीवरुन श्रवण टेकुळे याच्यावर नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोउपनि. टरके करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर वसमत रोडवर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. मुलींची छेड काढणार्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मागील काही दिवसात महिला, मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणात वाढ झाल्याचे दिसत आहे. पोलिसांनी महाविद्यालय, शिकवणी परिसरात गस्त वाढवावी, छेड काढणार्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
छेड काढणार्या आरोपीवर नवा मोंढा पोलिसात गुन्हा
छेडछाडीच्या घटनेनंतर महाविद्यालयीन विद्यार्थीनी घाबरुन गेल्या होत्या. पोलिसांनी त्यांना धिर दिला. यानंतर (Parbhani Police) नवा मोंढा पोलीस ठाणे गाठत आरोपींविरुध्द तक्रार देण्यात आली.
मदतीसाठी टोल फ्री क्रमांक
नागरीकांना तात्काळ मदतीसाठी ११२ या टोल फ्री क्रमांकावर किंवा महिला, मुलींनी १०९१ व १०९८ या टोल फ्री क्रमांकाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून मदत मिळवू शकता. मदतीसाठी पोलीस काका, पोलीस दिदी पथकाची स्थापना देखील करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांतर्गत दामिनी पथक स्थापन करण्यात आलेले आहेत.