परभणी शहरातील वसमत, रोडवर आला प्रकार निदर्शनास
परभणी (Parbhani Police) : एकाच क्रमांकाची असलेल्या दोन दुचाक्या रस्त्यावर धावत असल्याचा प्रकार (Parbhani city) परभणी शहरातील वसमत रोडवर काही जणांच्या लक्षात आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना (Parbhani Police) दिली. शहर वाहतूक शाखेकडून सदर वाहनांचा शोध घेतला जात आहे. चोरीची, बनावट क्रमांक असलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. आता वसमत रोडवर दोन दुचाकी सारख्याच क्रमांकाच्या असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या दोन्ही एकाच कंपनीच्या असून मॉडेल देखील सारखाच होता. (same number vehicles) दोन्ही गाड्यांवर प्रत्येकी ट्रिपल सीट बसून जात होते. हे वाहन चोरीचे आहे का? दोन्ही वाहनांपैकी कोणत्या गाडीचा नंबर योग्य होता हे पाहणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे सदर वाहनाची नोंद ऑनलाईन प्रणालीवर दाखवत नव्हती.
दोन्ही दुचाकींचा शोध सुरू
एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी धावत असल्याबाबत माहिती मिळाली आहे. वसमत रोडवर आणि इतर ठिकाणी सदर वाहनाचा शोध घेण्यात आला. नागरीकांना देखील एकाच क्रमांकाची दोन वाहने आढळून आल्यास त्यांनी याची माहिती (Parbhani Police) पोलिसांना द्यावी. योग्य माहिती देणार्यांना बक्षीस देण्यात येईल.
– मकसुद पठाण, पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा, परभणी.