Parbhani:- येथील गोदापात्रातून वाळुची चोरी करणार्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार ब्रास वाळू जप्त करत दोन तराफे नष्ट करण्यात आले.
कारवाईत चार ब्रास वाळू जप्त करत दोन तराफे नष्ट
परभणी तालुक्यातील धसाडी येथील गोदापात्रातून अज्ञात वाळू चोर हे गोदावरी नदीतून वाळुची चोरी (sand robbery)करत असल्याची माहिती दैठणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाये यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवार १५ जानेवारी रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत चार ब्रास वाळू जप्त केली व दोन तरफ ही नष्ट केले. या कारवाईनंतर पोलिसांनी महसूल विभागाला पाचारण करून पंचनामा करून वाळू महसूल विभागाच्या स्वाधीन केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये, सतीश देवकते, अशोक रसाळ, विठ्ठल कुकडे यांच्यासह महसूल कर्मचारी मंडळ अधिकारी सचिन शिंदे, तलाठी बालाजी बिडगर, कोतवाल आकाश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
सहा ब्रास वाळूचा ढिगारा नदीपात्रामध्ये लोटण्यात आला
यावेळी नदीच्या काठावर असलेली सहा ब्रास वाळूचा ढिगारा नदीपात्रामध्ये लोटण्यात आला. दरम्यान धसाडी परिसरामध्ये अनेक वेळा पोलिसांनी वाळू चोरांवर कारवाई केली परंतु महसूल प्रशासन येथील वाळूमाफीयांवर कारवाई कधी करणार हा प्रश्न धसाडी परिसरातील नागरिक विचारत आहेत.