पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या सुचना
परभणी (Parbhani Police) : बदली झालेले पोलीस अधिकारी, अंमलदार यांना कार्यमुक्त करावे, या बाबत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुचना दिल्या आहेत. या संदर्भात २३ ऑगस्ट रोजी पत्र काढण्यात आले आहे. (Parbhani Police) पोलीस अधिकारी यांचा विहिती कालवधी पुर्ण झाल्याने तसेच पदोन्नतीने त्यांच्या नेमणुका इतर ठिकाणी केल्या जातात. कालावधी पुर्ण झाल्यानंतर तसेच प्रशासकीय कारणांवरुन अंमलदारांच्या देखील जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात येतात.
बदली झालेल्या पोलीस अधिकारी अंमलदारांना बदलीवर सोडणे अनिवार्य असताना तसे केल्या जात नाही. बदलीचा उद्देश असफल होतो. तसेच इतरांच्या मनावर असमानतेची भावना निर्माण होते. त्यामुळे बदली झालेल्या (Parbhani Police) पोलीस अंमलदारांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी त्वरीत कार्यमुक्त करावे अशा सुचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्यात बदली पात्र तसेच संलग्न असलेल्या कर्मचार्यांची संख्या अधिक आहे.