परभणी/चारठाणा (Parbhani Police) : सेलू तालुक्यातील केमापूर येथे दुधना नदीहून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू विनापरवाना बेकायदेशीररित्या (Parbhani Police) चारठाणा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वाळूच्या ट्रॅक्टर पकडला. माहितीनुसार, चारठाणा येथील गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 28 मे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जामदार दत्ता भदर्गे (Parbhani Police) पोलीस जमादार रशीद शहा पोलीस नाईक विष्णुदास गरुड पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत आदीनीं वाई येथील दूध नदी वरून केमापुर कडे येणारा वाळूच्या ट्रॅक्टर पकडला.
त्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू पाच हजार रुपयाची व तीन लाख रुपयांच्या ट्रॅक्टर असा एकूण तीन लाख पाच हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर जागी सोडून पळून गेला. पोलिसांनी पाठलाग केला असता, तो मिळून आला नाही. बीट जमदार दत्ता भदर्गे यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास (Parbhani Police) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमदार सिद्धार्थ आचार्य हे करीत आहे. विशेष म्हणजे (Parbhani Police) चारठाणा व परिसरात विनापरवाना वाळू चोरटी मार्गाने मोठ्या प्रमाणावर जात आहे. परंतु महसूलचे अधिकारी झोपेच्या सोंग घेत आहे