परभणी/गंगाखेड(Parbhani):- शहरातून जाणाऱ्या नांदेड ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) गंगाखेड शहरात जागोजागी पडलेले जीवघेणे खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून संबधीत विभागाने किमान खड्डे तरी बुजवून घ्यावे अशी मागणी वाहन धारक करीत आहे तर गंगाखेड ते परळी महामार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान रस्त्याच्या बाजूने नाली न काढल्याने रस्त्यावरील पाणी शेतात शिरल्याने शेती मालाचे प्रचंड नुकसान होत असल्याची तक्रार वडगाव स्टे. येथील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर (Latur)विभागाकडे केली आहे.
नाली न काढल्याने शेती मालाचे नुकसान
गंगाखेड शहरातून जाणाऱ्या नांदेड ते पुणे राष्ट्रीय महामार्गाचे गंगाखेड बस स्थानक(bus station) ते परळी दरम्यान काम सुरू गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्यामुळे या महामार्गावरून रहदारी करणाऱ्या वाहन धारकांना वाहने चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गंगाखेड बस स्थानक(bus station) परिसरासह शहरातील परळी नाका ते परळी दरम्यान झालेल्या अर्धवट कामामुळे व परळी नाका ते भगवती कॉर्नर दरम्यान उपजिल्हा रुग्णालय, वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर, पोलीस ठाण्यासमोर, गॅरेज लाईन, चांद तारा चौक व जुना शनिवार बाजार परिसरात राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेले जीवघेणे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे. असे असतांना सुद्धा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने गंगाखेड शहर वासीयांसह वाहन धराकांतून संताप व्यक्त करीत रस्त्याच्या कामाला गती द्यावी किंवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे तरी बुजवावे अशी मागणी केली जात आहे.
महामार्गावरील पाणी शेतात शिरल्याने शेती मालाचे नुकसान
गंगाखेड ते परळी दरम्यान नांदेड ते पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी होऊन सुद्धा रस्त्याचे काम अपूर्णच असून या महामार्गावरील अपघात स्थळावर तसेच आवश्यक ठिकाणी रस्ता दुभाजक न लावल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या बाजूला नाल्या न काढल्यामुळे रस्त्यावरील पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांच्या शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षापासून होत असलेले शेतकऱ्याचे नुकसान व अपघाताच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन वडगाव स्टे. येथील रामेश्वर शिवाजी बचाटे, अतुल बचाटे, रामेश्वर प्रभाकर बचाटे, शाम प्रल्हाद देवकते, रामेश्वर काशिनाथ बचाटे आदींनी राष्ट्रीय महामार्गाचे लातूर विभागीय कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात सादर केले आहे.