परभणी रेल्वे सुरक्षा पोलीस दलाची कारवाई
परभणी (parbhani railway) : रेल्वेचे भंगार चोरुन विक्री करणार्या संशयीताला (parbhani railway) रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जवळून ३ हजार रुपयांचे भंगार आणि एक अॅटो जप्त करण्यात आला आहे. संबंधिताला रिमांडसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलीस कर्मचारी संतोष कांबळे, शुक्ला, मोगरे, लाशेटवार, बालाजी, अविनाश पाटील, के. प्रदीप यांचे पथक गोपनीय माहितीच्या आधारावरुन पाळत ठेवत होते. त्यांनी एका संशयीताला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता संबंधिताने आपले नाव शेख गौस शेख अफसर असे सांगितले. त्याच्या चौकशीत रेल्वेचे भंगार मिळून आले. तसेच (parbhani Police) पोलिसांनी एक अॅटो देखील जप्त केला आहे. संबंधित इसमाने ३ लोखंडी स्लीपर लोड चोरी केल्याची कबुली दिली.
अॅटोत टाकून नेला मुद्देमाल
ताब्यात घेण्यात आलेला इसम हा रोजंदारी मजुर आहे. मागील अनेक दिवसांपासून कोणतेही काम नसल्याने त्याने रेल्वेच्या भंगाराची चोरी केली. संबंधिता जवळून ३ लोखंडी स्लिपर लोर मिळून आले. (parbhani railway) रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत २६ जून रोजी न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर केले, अशी माहिती मिळाली आहे.
रेल्वे स्थानकावर वाढल्या चोर्या
परभणी येथील (parbhani railway) रेल्वे स्थानकावर चोर्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. गर्दीचा फायदा घेत प्रवाशांजवळील मोबाईल, दागिने, रोख रक्कम असे साहित्य चोरुन नेल्या जात आहे. काही दिवसापूर्वीच पूर्णा रेल्वे स्थानकावर एका महिलेजवळील दागिने चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती.