परभणी/पूर्णा (Parbhani railway) : द. म. रेच्या नांदेड रेल्वे विभागाने (Parbhani railway) रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सामानाची चोरी तसेच अनाधिकृत फेरीवाल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाने मागील ३ महीन्यांत विविध ठिकाणी तब्बल ४९० गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.
तीन महिन्यांत ४९० प्रकरणी कारवाई
नांदेड रेल्वे विभागातुन धावणा-या रेल्वे गाड्यांत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत फेरीवाले तसेच प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) सदरील गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी रेसुबलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त,अमित कुमार मिश्रा, नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने मागील जानेवारी ते एप्रिल महीन्यांत एकूण रेल्वे अॅक्ट १४४ अंतर्गत तब्बल ४९० प्रकरण नोंदवीले आहेत.
अनधिकृत फेरीवाले, प्रवाश्यांना लुटणाऱ्यांना बसणार जरब
त्यापैकी गत महिन्यात पथकाने १७१ प्रकरण दाखल केली आहेत. प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या २१ गुन्हेगारांना अटक केली आहे. यापुढेही या पथकाकडून रेल्वे स्थानके, धावत्या रेल्वेत पथकाची करडी नजर राहणार असून गुन्हेगारीचा बिमोड केला जाणार असल्याचे (Railway Division) रेल्वे विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे.