परभणी/झरी (Parbhani):- धनगर जमातीला अनुसूचित जमाती एस टी चे जात प्रमाणपत्र (Caste certificate) वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासननिर्णय काढण्याच्या अनुषंगाने व पंढरपूर, लातुर व नेवासा या ठिकाणी गेल्या दहा -बारा दिवसापासून उपोषणकर्ते आमरण उपोषणाला बसलेले असून सरकारने यांच्या मागण्या मंजूर कराव्यात व धनगर समाजाला एस टी आरक्षण अंमलबजावणी लवकरात लवकर करावी या साठी आज सोमवार रोजी सकाळी १०:वाजता सकल धनगर समाजाच्या वतीने परभणीतील झरी येथे अहिल्यादेवी होळकर चौकात रास्तारोको आंदोलन करून नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर चौकात रास्तारोको आंदोलन
या निवेदनावर दत्तराव होनाजी जगाडे, अशोक अजबराव जगाडे, संदिप दत्तराव बोरकर, काशिनाथ आश्रोबा जगाडे, बाळासाहेब माणिकराव जगाडे, दत्ता ज्ञानोबा जगाडे ,
यशवंत मधुकरराव जगाडे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनात झरी व पंचक्रोशीतील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्धा तास चाललेल्या आंदोलनात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या व पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.