पाथरी उपविभागीय कार्यालयात राबविला उपक्रम
परभणी/पाथरी (Parbhani Revenue Activity) : सुरु झालेल्या महसुल नववर्षाच्या निमित्ताने महसुल विभाग महसुल पंधरवडा साजरा करत असुन रविवारी उपविभागीय कार्यालय येथे कार्यालय स्वच्छता व परिसरात वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात आला.
कार्यालय परिसरात वृक्षारोपण
राज्य शासनाचा महसुल व वन विभाग महसुल पंधरवडा २०२४ अंतर्गत महसुल व वन विभागाचा महसुलोत्सव १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान राबविणार आहे .त्याचा भाग म्हणुन रविवार ४ ऑगस्ट रोजी पाथरी येथील उपविभागीय कार्यालय स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम राबविण्यात आला भावेळी प्रवेशद्वारात काढलेली सुंदर रांगोळी ल्क्ष वेधुन घेत होती . दरम्यान परिसरात उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी , तहसिलदार शंकर हंदेशवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार वंसत महाजन , यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी ,तलाठी व कोतवाल आदी उपस्थित होते.