परभणी(Parbhani):- प्रलंबीत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संपावर असलेल्या महसुलच्या कर्मचारी (Employee)संपाला नऊ दिवसांचा कालावधी झाला आहे. संपात तोडगा निघाला नसल्याने कामकाज ठप्प पडले आहे.
कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने कर्मचारी संपावर
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या(Customs Employees Association) विविध प्रलंबीत मागण्यांसंदर्भात शासनस्तरावरुन कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने कर्मचारी संपावर गेले आहेत. १५ जुलै पासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला नऊ दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरी देखील तोडगा निघालेला नाही. सोमवारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी(proclamation) करत लक्ष वेधले.
शैक्षणिक व इतर दैनंदिन कामे खोळंबली
सध्या शैक्षणिक प्रवेशाचे दिवस सुरू आहेत. शाळा, महाविद्यालया प्रवेशाकरीता विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र महसुलचे कर्मचारी कामबंद आंदोलनावर असल्याने कामकाज ठप्प आहे. जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, इडब्ल्युएस (EWS) प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर असे प्रमाणपत्र काढण्याचे काम बंद आहे. त्याच प्रमाणे शेतकरी (Farmer), निराधार व इतर नागरीक यांना देखील दैनंदिन व शासकीय जीवनात आवश्यक असलेले विविध कागदपत्र सध्या बंद आहेत. त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. आंदोलनात लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.