परभणी (Parbhani Road) : ही अजब गजब घटना परभणीतील प्रभाग क्र. १५ येथील भाग्यलक्ष्मी नगर येथे घडली आहे. काल रात्री सर्व नागरिकांनी मोबाईल टॉर्च, कंदील इत्यादीच्या साहाय्याने आसपासच्या परिसरात (Parbhani Road) रोडचा शोध घेतला. परंतु रोड काही सापडला नाही. (Parbhani Police) पोलीस प्रशासन आणि (Municipal Corporation) महापालिकेने तात्काळ चोरीला गेलेल्या रोडचा शोध घ्यावा व चोरांना गजाआड घालून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. नागरीकांच्या या अजब मागणीची परभणीकरांत चांगलीच चर्चा होत आहे.
माहितीनुसार, भाग्यलक्ष्मी नगर येथील रहिवाशांना सारंग स्वामी विद्यालय जवळ महापालिकेचा एक फलक आढळून आले. त्यावर (National Highway) राष्ट्रीय महामार्ग ते रविराज दादा देशमुख यांच्या घरापर्यंत च्या सीसी रोड चे काम पूर्ण झाले असल्याचा तो फलक होता. निविदेची रक्कम ही ४२ लक्ष ११ हजार जवळपास होती.
फलकावर रोड चे काम सुरु झाल्याची तारीख त्याच प्रमाणे रोडचे (Parbhani Road) काम पूर्ण झालेची तारीख ५ फेब्रुवारी २०२४ अशी नोंद करण्यात आली होती. आपल्या नगरातील रस्ता फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाला आहे, तर तो आपल्याला दिसला नाही ? असा प्रश्न नागरीकांतून उपस्थित केला जात आहे. शहरातील वाढलेले चोर्यांचे प्रमाण पाहता आपल्या कॉलनीतील रोड चोरीला तर गेला नसेल ना? असा संशय भाग्यलक्ष्मी नगर वासीय व्यक्त करत आहेत.