परिवहन विभागातील ३८ सेवा फेसलेस स्वरूपात सुरू
परभणी (Parbhani RTO staff strike) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचार्यांनी २४ सप्टेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. परभणी येथील कर्मचारी (RTO staff strike) देखील संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे कामकाज खोळंबत आहे. नागरीकांनी आपल्या कामासाठी कार्यालयात प्रत्यक्षात न येता विभागाच्या संकेत स्थळावर अर्ज करावा, फेसलेस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी (Officer Ashwini Swamy) यांनी केले आहे.
नागरीकांचे कामकाज सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने कार्यालयातील अधिकार्यांच्या नियुत्तäया केल्या आहेत. परिवहन विभागातील ३८ सेवा नागरीकांच्या सोयीसाठी फेसलेस स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. नागरीकांनी आपल्या कामाकरीता कार्यालयात प्रत्यक्ष न येता विभागाच्या संकेत स्थळावर अर्ज करावा, संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व कामकाजात विलंब होणार नाही. भविष्यात जनतेने फेसलेस सुविधेचा वापर करावा, असे आवाहन (RTO staff strike) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी (Officer Ashwini Swamy) यांनी केले आहे.