परभणी(Parbhani):- सेलूतालुक्यातील देऊळगाव गात येथील संदीप रोहिदास गायकवाड या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे. त्याच्या कुटुंबीयास शासकीय मदत देण्याची मागणी बुधवार २१ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाज सेलू च्या वतीने तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांच्यावतीने प्रशासनात करण्यात आली आहे.
सकल मराठा समाज सेलूच्या वतीने केली मागणी
सेलूचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संदीप रोहीदास गायकवाड राहणार देऊळगाव गात तालुका सेलू जिल्हा परभणी यांनी २९जुन २०२४रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. या विवंचनेतून गळफास (Suicide)घेऊन आपले जीवन मराठा समाजासाठी संपवले होते. त्यांच्या घरी आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.त्यांचा घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. तरी त्यांच्या परिवाराला शासकीय २५लाख रुपये आर्थिक मदत(financial aid) तात्काळ देण्यात यावी व परिवारातील एकाला शासकीय सेवेत घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सकल मराठा समाज सेलू च्या वतीने देण्यात आले. यावेळी जयसिंग शेळके, श्याम कदम, सचिन कदम, विठ्ठल कदम, ज्ञानेश्वर कदम, चैतन्य कदम, रवि मोगल, किरण कदम, मच्छिंद्र कदम, गौरव कदम, अर्जुन कदम, सुधीर कदम, आकाश गोरे, सचिन सोळंके, सचिन गोरे व इतर मराठा बांधव उपस्थित होते.




