रोज वेगवेगळ्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदच्या मुख्य इमारतीत धरणे
परभणी (Parbhani Zilla Parishad) : जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्रशाला कोल्हा या शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सोमवार १ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी परभणी येथील जिल्हा परिषद कार्यालय गाठत आंदोलन केले. त्यानंतर मागणीचे निवेदन (Parbhani Zilla Parishad) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले. जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा शाळेत मागील दोन, तीन वर्षापासून सामाजिक शास्त्र, भाषा, कला शिक्षक, सेवक इत्यादी पदे रिक्त आहेत. दोन माध्यमिक शिक्षकांवर शाळेचा कारभार चालत होता.
जि.प.प्रशाला कोल्हा येथील विद्यार्थी पोहोचले जिल्हा परिषदेत
मात्र त्यातील एका शिक्षिकेचे जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्रशाला मानवत या ठिकाणी समायोजन करण्यात आले आहे. कोल्हा येथील शाळेत मोठया संख्येने विद्यार्थी संख्या असतांनाही पुरेशा प्रमाणात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षिकेचे समायोजन रद्द करावे, रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास शाळा बंद आंदोलन (Parbhani School), पालकांचे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर रामचंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर ठोंबरे, बंडू पाचले, हनुमान कंठाळे, बाळासाहेब आढाव, गोविंद भिसे, मनोज भिसे यांच्यासह मोठया संख्येने पालकांच्या स्वाक्षर्या आहेत.