परभणी/गंगाखेड(Parbhani):- लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम पत्रिकेत सर्वांची नावे आहेत मात्र ज्येष्ठ नेते शरद पवारांचे(Sharad Pawar) नाव या निमंत्रण पत्रिकेत छापल नाही म्हणजे सरकार शरद पवारांना घाबरल असल्याचे सांगत खासदार अमोल कोल्हे यांनी गंगाखेड येथील शिव स्वराज्य यात्रेत बोलतांना राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली शिव स्वराज्य यात्रा शहरात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस(Nationalist Congress) शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली शिव स्वराज्य यात्रा दि. १६ ऑगस्ट शुक्रवार रोजी रात्री गंगाखेड शहरात दाखल झाली. रात्री उशिराने शहरातील कापसे मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमास खा. अमोल कोल्हे, राज्यसभा सदस्य खा. फौजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, परभणी जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे, मा.आ. सिताराम घनदाट मामा, संजय गायकवाड, प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट, सुनील गव्हाणे, रमाकांत कुलकर्णी, भिमराव हत्तीअंबिरे, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे, बालासाहेब निरस, बाळ काका चौधरी, तालुकाध्यक्ष उद्धवराव सातपुते, वसंतराव सिरस्कर, देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की गंगाखेड विधानसभेतून निवडून येणारा उद्याचा आमदार आपला राहणार आहे व तो आमदार सत्तेत बसणार आहे. उद्या शनिवार रोजी शासनाच्या वतीने बालेवाडी येथील स्टेडियममध्ये आयोजीत करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना कार्यक्रमात सर्व लोकप्रतिनिधींची नावे आहेत पण महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे खासदार शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असतांना सुध्दा त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नाही.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची राज्य आणि केंद्र सरकारवर सळकून टीका
प्रोटोकॉल (protocol) प्रमाणे शरद पवारांच नाव पत्रिकेत छापायला हवं होतं ते छापल नाही. ज्या शरद पवारांनी राज्यातील नव्हेत तर देशातील माता भगिनींना सन्मान आणि स्वाभिमान दिला. त्या शरद पवारांचे नाव लाडकी बहिण योजना कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नसावं म्हणजे शरद पवारांना राज्य सरकार घाबरलंय असच म्हणावं लागेल असेही यावेळी बोलतांना खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं. तर इनकम टॅक्स सीबीआय (CBI)आणि ईडीचा गैरवापर करून राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांना नामोहरम करण्याचं काम या सरकारन केल्याचं म्हणत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर(Central Govt) सळकून टीका केली. आणि हे सरकार म्हणजे महागाई, बेरोजगारी वाढवणार, मोठ्या पध्दतीने भ्रष्टाचार करणार राज्य असे हे सरकार MBBS सरकार असल्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
गंगाखेड मतदार संघ दहशत मुक्त करण्यासाठी संधी द्यावी- मा.आ. सिताराम घनदाट मामा
गंगाखेड विधानसभेच्या विद्यमान आमदाराने सामान्य जनतेच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणे, व्यापाऱ्यांना मारहाण करणे, खोटे गुन्हे दाखल करणे, संत जनाबाई मंदिर, गोरक्षण सारख्या संस्थानांवर दबावतंत्र वापरून ताबा घेणे आदी प्रकारची कामे करून मतदार संघात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. हा मतदार संघ दहशत मुक्त करण्यासाठी पक्षाने व मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन याप्रसंगी बोलतांना मा.आ. सिताराम घनदाट मामा यांनी केले.
मराठा आंदोलक सभास्थळी
गंगाखेड शहरात शिव स्वराज्य यात्रेचे आगमन झाल्याचे समजताच सदानंद भोसले, कृष्णा भोसले, राजेभाऊ खोडवे, अरुण गिराम, बाळासाहेब बेंद्रे, गोविंदराव मुळे, विठ्ठल जाधव, अमोल कटिंग, अशोक गिराम, सचीन चोरघडे, विठ्ठलराव सुर्यवंशी, विठ्ठल निरस, संजय सोळंके, गोविंदराव सोळंके, रामेश्वर पवार आदी असंख्य मराठा आंदोलकांनी सभास्थळी येऊन घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशा मागणीचे निवेदन खासदार अमोल कोल्हे यांना दिले.