परभणीतील जि.प. मनपावर सदस्य नोंदणीच्या जोरावर भगवा फडकवू – आनंद भरोसे…!
परभणी (Parbhani Shiv Sena) : विधानसभेतील झरी येथे शिवसेनेची आढावा बैठक बुधवार १६ एप्रिल रोजी घेण्यात आली. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास सुरूवात करण्यात आली. जिल्हा परिषद व महानगर पालिकेवर सदस्य नोंदणीच्या जोरावर भगवा फडकवू, असा निर्धार शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी व्यक्त केला.कुंभकर्ण टाकळी, बोबडे टाकळी, पिंगळी या तिन्ही जिल्हा परिषद सर्कल, उखळद व जांब या दोन पंचायत समिती गण मध्ये सुद्धा शिवसेने तर्पेâ सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे, असे (Parbhani Shiv Sena) शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्पेâ सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. सदस्य नोंदणीच्या जोरावर येणार्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका जिंकायच्या आहेत असा दृढ निश्चय यावेळी करण्यात आला. परभणी विधानसभा अंतर्गत चार जिल्हा परिषद सर्कल निहाय बैठका होणार आहेत. त्याचप्रमाणे परभणी महानगरपालिकेत प्रभाग निहाय बैठका घेण्यात येणार आहेत.
परभणी विधानसभे अंतर्गत शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियानास आनंद भरोसे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली असून, (Parbhani Shiv Sena) परभणी विधानसभेत ४०,००० सदस्य नोंदणीचा निर्धार केलेला आहे. शिवसेना पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खा. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणी सुरु आहे.
झरी येथे पारपडलेल्या सदस्य नोंदणी आढावा बैठकी वेळी प्रल्हाद होगे, प्रभाकर कदम, संदीप उर्फ पप्पू जाधव, बाळासाहेब पानपट्टे, गीता सूर्यवंशी, कल्पनाताई दळवी, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, आसाराम चव्हाण, उद्धवराव गायकवाड, मारोती पवार, भीमराव बसुळे, शैलेश दीक्षित, गजानन बोरकर, गौरव सावंत, प्रभाकर देशमुख, पांडुरंग जाधव, पप्पु बावरी, शिवाजी खिस्ते, बंडू भुसारे, आकाश नाईक, अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
