गायक कुणाल कामरा वर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी
परभणी/पुर्णा (Parbhani ShivSena) : महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंञी तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख ना.एकनाथराव शिंदे याचां विषयी गाण्यातुन वायफळ बडबड करुन समाजस्वास्थ बिघडवणारा फालतु गायक कुणाल कामरा वर ताबडतोब गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी आज पुर्णा तालुका शिवसेना पक्षाकडुन एका निवेदनाव्दारे करण्यात आली.
मागील दोन दिवसापुर्वी एका कार्यक्रमात गायक कुणाल कामरा यानी आपल्या एका गीता तुन उपमुख्यमंञी एकनाथराव शिंदे याचां वर शिंतोडे उडवले होते याबद्दल (Parbhani ShivSena) शिवसेना कार्यकर्त्यांन मध्ये प्रचंड नाराजी व असंतोष निर्माण झाला त्याचाच परिणाम म्हणून आज पुर्णेतील व तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते एकञित येऊन कुणाल कामरा याचा निषेध व्यक्त करून त्यास अटक करून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन आज येथील पोलीस निरीक्षक विलास घोबाळे यांना देण्यात आले.
या वेळी (Parbhani ShivSena) शिवसेना जिल्हाप्रमुख माधव कदम, उप जिल्हाप्रमुख एकनाथ लोखंडे, तालुका प्रमुख प्रकाश क-हाळे, शहर प्रमुख विशाल किरडे, उपशहरप्रमुख, लक्ष्मण कदम, युवासेना शहर अंकीत कदम, सुनिल इंगोले, राजुभाऊ लोखंड, नागनाथ शिंदे , सोलव ,दासराव देसाई,तुळशिराम खैरे, प्रदीप खैरे, सागर सवराते, बळीराम खैरे, हरी पाटील सुर्यवंशी आदी सह जिल्ह्य़ातील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.