उद्धव ठाकरे शिवसेना महिला आघाडी आक्रमक शहरातील शिवाजी चौकात जोडे मारो आंदोलन
परभणी (Parbhani Shivsena) : शहराची वाताहत करणार्या महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली करावी, अशी मागणी करत (Parbhani Shivsena) शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मंगळवार ३० जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्तांच्या प्रतिमेला जोडे (jode maro Andolan) मारून निषेध करण्यात आला.
शहराच्या दुरावस्थेकडे वेधले लक्ष
आ. डॉ. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वात (Parbhani Shivsena) शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करत महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यातील खड्डे कच टाकून बुजविले. आंदोलनाला सौ. वंदना कदम, कविता नंदूरे, संगिता टेहरे, कवाळे, सुचिता गिरी, मंदा वाघमारे, दिपा बोरूळ, निर्मला भावसार, रेखा बोखारे, सुनिता कांबळे, वैशाली खाडे, कांचन राठोड, अर्चना जाधव, संगिता चट्टे, श्वेता लव्हांडे, शुभांगी कुलकर्णी, सविता तावडे, स्वाती बेजगमवार, अश्मिता जाधव, मंदा दहिवाळ, नंदा साखरे, मंगल दहिवाळ, संतोषी वाघमारे, रामावत, मनिशा शिंदे, रेखा गवारे, लिना आदींची उपस्थिती होती.