सुखा मेवा व रोख रक्कम लंपास
परभणी (Parbhani Shops Thieves) : गंगाखेड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत बुधवार ११ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडून सुखा मेव्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना (Parbhani Shops Thieves) नवा मोंढा परिसरात घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील मुख्य बाजार पेठेत नवा मोंढा परिसरात बुधवार ११ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी या भागात असलेल्या श्रीनेश किराणा दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडत दुकानात प्रवेश करून दुकानातील काजू, बदाम, खोबरा तेल बॉटल तसेच दुकानाच्या काऊंटरमध्ये ठेवलेली रोख रक्कम लंपास केली आहे. किराणा दुकानात चोरी झाल्याची माहिती बुधवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समजताच दुकान मालक रवि अशोकराव कवटकवार यांनी मोंढा परिसरात दुकानाकडे जाऊन पाहणी केली असता याच भागातील ज्ञानेश्वर शिंदे यांचे माऊली ट्रेडर्स व अनिल भुमरे यांचे आयुष कृषी केंद्र या दोन दुकानात ही चोरी झाल्याची माहिती समोर आली.

मंगळवार १० फेब्रुवारीच्या रात्रीपासून ते बुधवार ११ फेब्रुवारी रोजीच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोंढा परिसरात धुमाकूळ घालीत (Parbhani Shops Thieves) तीन दुकाने फोडत किराणा दुकानातील सुखा मेवा व रोख रक्कम तसेच अन्य काही साहित्य लंपास केले आहे. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी रवि कवटकवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, सपोनि आदित्य लोणीकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चोरट्यांचा बंदोबस्त करावा व्यापारी महासंघाची मागणी
शहरातील नवा मोंढा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत माऊली ट्रेडर्स दुकानातील रोख पाच ते सात हजार रुपये, अनिल भुमरे यांच्या आयुष कृषी केंद्र या दुकानातील गल्ल्यातून पाच ते सहाशे रुपये रोख व श्रीनेश किराणा दुकानात ठेवलेले पावणे दोन ते दोन लाख रुपये रोख रकमेसह सुखा मेवा व अन्य साहित्य चोरीस (Parbhani Shops Thieves) गेल्याची माहिती समजताच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी यांनी पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांची भेट घेऊन रात्रीच्या वेळी शहरातील बाजार पेठेत पोलीस गस्त वाढवावी, रात्र गस्तीवरील पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडतात का याची शहानिशा करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनातून केली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी यांच्यासह सिडस अँड फटीॆ॔लायझर असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे, मोबाईल असोसिएशन संघटनेचे सचिन कवटकवार, अनिल भुमरे, रवि कवटकवार आदी व्यापारी उपस्थित होते.




