पोलीसांनी आरोपीला हत्यारासह केले जेरबंद..
परभणी/पूर्णा(Parbhani/Poorna):- दिवसाढवळ्या हातात पिस्तूल घेऊन एका 32 वर्षे तरुणावर गोळीबार करून वार करून दहशत माजवल्याची घटना पूर्णा शहरातील डॉ आंबेडकर (Dr. Ambedkar) नगर भागात सोमवारी २९ रोजी दुपारच्या वेळी घडली आहे. पोलीसांनी गोळीबार(firing) करणाऱ्या त्या युवका हत्यारासह जेरबंद (Imprisoned) केले असून, त्याचे विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
आरोपीने कळ्या रंगाचे पिस्तुल काढून त्यातुन गोळीबार केला
घटनेबाबत अधिक माहिती अशी की,पूर्णा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवासी असलेल्या सचिन मगरे वय ३२ वर्षे हा सोमवारी २९ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत डॉ आंबेडकर हाॅल येथे उभा असताना याच भागात राहणारा गौतम उर्फ सोनु खंदारे हा त्यांचा जवळ आला. काहीही एक कारण नसताना ‘कुत्रे हो तुम्ही लय माजलात’ असे म्हणून त्याच्याजवळ असलेले कळ्या रंगाचे पिस्तुल काढून सचिनवर रोखून त्यातुन गोळीबार केला. प्रसंगावधान दाखवत सचिनने आपला जीव वाचवला (Saved lives) पण त्याने यानंतर त्याच्या जवळ असलेल्या खंजिराने सचिनवर पुन्हा एकदा जिवघेणा हल्ला (fatal attack) केला. त्यात त्याच्या डाव्या खांद्याला जखम झाली आहे.
घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली
गोळीबाराची घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. लोक सैरावैरा पळू लागले.घटनास्थळावरुन हल्लेखोर गौतमनेही पोबारा केला. सचिन ने आपल्या प्रविण कनकुटे नामक मित्राला सोबत पोलीसांत धाव घेतली दरम्यान येथिल काही सामाजिक कार्त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. स्थानिक पोलीस, गुप्तचर यंत्रणाच्या (Intelligence system) पथकाने हल्लेखोर गौतमला फुले नगर परिसरातून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे. याप्रकरणी सचिन संजय मगरे रा.आंबेडकरनगर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गौरव उर्फ सोनू खंदारे यांच्या विरोधात प्राण घातक हल्ला करणे अवैध शस्त्र (illegal weapon) बाळगणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घातक शस्त्र जप्त केली आहेत घटनेचा तपास पूर्णा पोलीस करत आहेत.