परभणी/गंगाखेड(Parbhani):- विधानसभा निवडणुकीसाठी(Assembly Elections) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार दि. २९ ऑक्टोबर हा अंतिम दिवस असल्याने सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी प्रमुख उमेदवारांसह एकूण सोळा उमेदवारांनी १८ उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक रिंगणात १७ उमेदवारांचे २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. शेवटच्या दिवशी मंगळवार रोजी अर्ज दाखल करण्याठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे.
उमेदवारी अर्जाची संख्या झाली २०
गंगाखेड विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजताच सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी करण्यासाठी गर्दी करत ५२ जणांनी ९८ अर्जाची खरेदी केली. यापूर्वी विद्यमान आ. रत्नाकर गुट्टे यांनी दोन अर्ज दाखल केले होते. उद्या मंगळवार २९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करम्याचा अंतिम दिवस असल्यामुळे १६ इच्छुक उमेदवारांनी सोमवार २८ ऑक्टोबर रोजी १८ उमेदवारी अर्ज निवडणूक (elections) निर्णय अधिकारी जिवराज डापकर यांच्याकडे सादर केले आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम, वंचित बहुजन आघाडीचे सिताराम घनदाट मामा यांच्यासह विठ्ठलराव रबदडे मामा, भगवान सानप, श्रीकांत भोसले, बालासाहेब निरस, एमआयएमच्या शिरीन बेगम मो. शफिक, विष्णुदास भोसले, डॉ. संजय कदम, डॉ. स्मिता कदम, माधव शिंदे, मदन रेनगडे, मुंजाजी जोगदंड, प्रविण शिंदे, नामदेव गायकवाड, लक्ष्मण शिंदे आदी उमेदवारांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या मंगळवार रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच वेळ असल्याने रासपा तसेच महायुतीचे पुरस्कृत उमेदवार आ. रत्नाकर गुट्टे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्याप्रमाणेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अपक्ष व अन्य पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी राहणार आहे.